Tuesday, January 12, 2021

कोरोना





२०२० हे पूर्ण वर्ष कोरोना  मुळे  गेले , नवीन असा काही करता आला नाही .  माझा स्वतःचा असा अनुभव कि मार्च  ते जुलै पुणे मध्ये कसे बसे काढले . 

औगेस्ट मध्ये होऊ नये या  भीती ने मी रत्नागिरी मध्ये निघून गेलो. तिकडे मस्त ३ ते ४ महिने काम व आराम केला. 

पुणे मध्ये परत नोव्हेंबर ला आलो दिवाळी साठी . डिसेंबर ला नेमका १ तारखेला ताप आलाच. 


जवळचा डॉक्टर दाखवून घेतले तर त्यांनी २ ३ दिवस गोळ्या देऊन पण ताप येतच होता. मग आमचा आयुर्वेद डॉक्टर ना दाखवून ३ ४ दिवस काढले  तरी काय जात नव्हता ताप . ह्या मध्ये ६ ते ७ दिवस घालवले. 

मग मात्र मला कॉरोन ची टेस्ट हे करावी लागली. हि टेस्ट मी स्वतः दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये दाखवून  घेतले . 

कोविड सती असलेले ते वॉर्ड मध्ये जाऊन चेकिंग करणे खूप धैर्य लागते . भीती निघून गेली होती पोस्टिव्ह किंवा नेगीतिवे चा टेन्शन नव्हता, ताप लवकर जावा हे वाटत होत. 


मागील ८ दिवस हा त्रास म्हणजे असा कि रात्री ताप भरून येणे आणि झोप अजिबात न लागणे .  मळमळ मुळे जेवण तर जाताच नवहतं .  खूप थकवा असा येत होता .  


मग जसे रिपोर्ट हे पोस्टिव्ह आले तास डॉक्टर नि मला पूर्ण १ महिनेच चा गोळ्याचा कोर्से दिला . आणि लगेच १ दिवसात ताप  जाऊन मग आराम मिळाला 

पण १५ दिवस मात्र घर मध्ये बंद होते पण मुलगा आणि पत्नी दोघे पण माझा सोबत असून त्यांना त्रास नाही झाला . 


१ २ दिवस मात्र आम्ही लांब राहिलो पण नंतर मात्र आम्ही एकत्र चा होतो. कारण माणूस त्या मध्ये मानसिक खूप थकवा येतो . त्याचा मनात चांगला असा काही येत नाही आत्मविश्वास कमी होतो . 


मला थोडा हृदय  मध्ये धडधड वाढत असताना मी डॉक्टर ना दाखवून सर्व चेक करून घेतले . सर्व नॉर्मल आहे तेव्हा  बर कुठं  वाटलेलं 


गोळी तापाची ५ दिवसाची होती .  आणि सि आणि बी  व्हिटॅमिन च्या गोळी ह्या पूर्ण महिना होता. रक्त पातळ होयची गोळी पण घेतली १ महिना. 

थकवा आणि स्ट्रेस दोनी हळू हळू कमी होत होत.



म्हणता म्हणता १४ दिवस गेले. झोप येत नव्हती म्हणून झोपे चे गोळी घेतली.  फक्त थकवा बाकी काही त्रास नव्हता . 


एक महिना मध्ये मस्त झालो पण थकवा काही जात नव्हता .  १ महिना उलटून जसा गेला तास परत एकदा झोरात काम पहिला सारखी चालू झाली 





No comments: